मद्यप्रेमींसाठी एक महत्वाची बातमी आहे. विकेंड किंवा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जर तुम्ही दारु पार्टी करण्याच्या विचारात असाल तर जरा थांबा. दारू खरेदीसाठी तुम्हाला आता वयाची अट पुर्ण करावी लागणार आहे. दारू खरेदीसाठी आधारकार्ड सक्तीचं करण्यात आलंय. त्यामुळे आता सहज बाजारात मिळाणाऱ्या मदिरेसाठी कागदपत्रांची पुर्तता करण्याची तयारी तुम्हाला करावी लागणार .
दारूसाठी चक्क आधार कार्ड द्यावं लागेल तेही ओरिजिनल आणि इतकंच नव्हे तर तुम्ही तुमच्या वयाची २५ वर्ष पुर्ण केली असतील तरच तुम्हाला दारू खरेदी करता येणार आहे.
दारू विक्रीसाठी नेमक्या काय गाईडलाईन्स :
25 वर्षांखालील व्यक्तींना दारु विक्री बेकायदेशीर ठरणार
- दारू विक्री करणाऱ्या हॉटेल्स, क्लब्स, रेस्टोरंट्सना नियम बंधनकारक
- ग्राहकांच्या ओळखपत्राच्या हार्ड कॉपीच्या पडताळणीचे आदेश
- अल्पवयीन तरुणांकडून मद्यपानाच्या तक्रारी वाढल्याने निर्णय
- अल्पवयीन तरुणांना दारू विक्री केल्यास परवाना रद्द होणार
- कायदेशीर मद्यपानाच्या वयाच्या नियमांचे पालन न केल्यास कारवाई होणार आहे.
अल्पवीयन तरुण तळीराम होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. हा निर्णय जरी चांगला असला तरी या हा निर्णय दिल्ली सरकारनं घेतलाय. त्यामुळे पुढच्या काळात महाराष्ट्रातही हा निर्णय़ लागू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.