"...... तरच नांदायला येईन, बायकोची विचित्र मागणी" नवऱ्याने उचललं टोकाचं पाऊल
img
Dipali Ghadwaje
राजस्थानमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. राजस्थानमधील बांसवाडा जिल्ह्यातील कुशलगड पोलीस ठाण्यात पतीने पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कारण बायकोनं सासरी नांदायला येण्यासाठी चक्क दारू आणि मटनाची अट ठेवली आहे. यामुळे वैतागून तिच्या नवऱ्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. त्याने बायकोच्या कुटुंबीयांवर फसवणूक केल्याचा आरोपही केला आहे. 

तिच्या नवऱ्याने पोलिसांना सांगितले की, मागील वर्षी त्याची बायको रक्षाबंधननिमित्ताने माहेरी गेली होती.तेव्हापासून ती सासरी परतलेली नाही. नेहा आणि चिराग असं या जोडप्याचं नाव आहे. जेव्हा चिरागने नेहाला सासरी परत येण्यासाठी विचारलं, तेव्हा नेहाने त्याच्यासमोर अशी विचित्र अट ठेवली.
 
पीडित चिरागने एका वृत्त वाहिनीच्या हवाल्यानुसार चिरागचे कुटुंबीय बऱ्याच दिवसांपासून त्याच्या लग्नासाठी मुलगी शोधत होते. दरम्यान, त्याच्या एका ओळखीच्या व्यक्तीने त्याला नेहा जैन या मध्य प्रदेशातील इंदूर येथे राहणाऱ्या मुलीचं स्थळ सुचवलं. दोन्ही कुटुंबीय एकमेकांशी बोलले.दोन लाख रुपयांची गरज असल्याचं मुलीच्या कुटुंबीयांनी चिरागला सांगितलं.

चिरागला नेहा आवडली. त्यांचं लग्न २ लाख रूपयांच्या अटीवर निश्चित झालं होतं. त्यानंतर त्यांनी जून 2023 मध्ये लग्न केलं. पण सासरच्या घरी पोहोचताच नेहाने तिचं खरं रूप दाखवायला सुरुवात केली. लग्नानंतर अवघ्या चार दिवसांतच नेहाचे वडील चिरागच्या घरी आले. लग्नानंतर घरी काही विधी पूर्ण करायचे आहेत, असं सांगून नेहाला सोबत घेवून गेले. काही दिवसांनी ती सासरी परतली. परंतु सारखी अज्ञात व्यक्तीसोबत फोनवर तासनतास बोलत असायची.

एका दिवशी नेहा दारूच्या दुकानात पोहोचली. तिने तेथून दारूची बाटली आणली आणि ती घरीच प्यायला लागली.सासरच्यांनी तिला दारू पिताना पाहिल्यानंतर नेहाने त्यांना धमकावले. तिला पुन्हा अडवलं तर ती त्यांच्याविरुद्ध पोलिसांत खोटी एफआयआर दाखल करेल, अशी धमकी दिली. 

त्यामुळे सासरचे लोकं घाबरले. त्यानंतर नेहा रक्षाबंधनासाठी माहेरी गेली ती अद्याप परतलीच नाही. सध्या कुशलगड पोलिसांनी चिरागच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. नेहा आणि तिच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली जात आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group