१८० रुपयांची दारू चांगलीच गाजली ! फक्त हिवाळ्यात विकल्या गेल्या तब्बल १७,९०,००० बॉटल्स
१८० रुपयांची दारू चांगलीच गाजली ! फक्त हिवाळ्यात विकल्या गेल्या तब्बल १७,९०,००० बॉटल्स
img
वैष्णवी सांगळे
भारतातील लोकप्रिय दारू ब्रँड इंपीरियल ब्लूने एक मोठा कारनामा केला आहे. भारतातील प्रसिद्ध ब्रँड्समध्ये समाविष्ट असलेल्या इंपीरियल ब्लूने विक्रीचा नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. इंपीरियल ब्लूने विक्रीचे सर्व रेकॉर्ड मोडत सुमारे १.७९ मिलियन (अंदाजे १७,९०,०००) बाटल्या विकल्या आहेत. 

इंपीरियल ब्लू (Imperial Blue) म्हणजे एक लोकप्रिय भारतीय व्हिस्कीचा ब्रँड आहे, जो मूळतः सीग्रामने सुरू केला आणि आता तो पेर्नोड रिकार्डच्या मालकीचा आहे, जो भारतात मोठ्या प्रमाणावर विकला जातो आणि 'IB' (आयबी) म्हणूनही ओळखला जातो. अलीकडेच, मराठमोळ्या टिळकनगर इंडस्ट्रीज या कंपनीने हा ब्रँड फ्रेंच कंपनी Pernod Ricard कडून खरेदी केला आहे. 

टिळकनगरसोबत झालेल्या डीलनंतर पहिल्यांदाच समोर आलेल्या विक्री आकडेवारीनुसार, टिळकनगर इंडस्ट्रीजने इंपीरियल ब्लू ब्रँडची विक्री जबरदस्त वाढवली आहे. टिळकनगरपूर्वी इंपीरियल ब्लू ब्रँहा ब्रँड फ्रान्सच्या कंपनी पर्नोड रिकार्डकडे होता. खरेतर या ब्रँडची सर्वाधिक विक्री भारतातच होते. हे व्हिस्कीच्या प्रमाणानुसार देशातील तिसरा सर्वात मोठा ब्रँड आहे. 

इंपीरियल ब्लू ब्रँड इतका लोकप्रिय होण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक कारण म्हणजे त्याची किंमत. देशाच्या राजधानी दिल्लीविषयी बोलायचे झाले तर इंपीरियल ब्लूच्या १८० मिलीची किंमत फक्त १८० रुपयांच्या आसपास आहे. तर पूर्ण बाटलीची किंमत सुमारे ६०० रुपयांच्या आसपास आहे.
liquor | wine |
इतर बातम्या
Join Whatsapp Group