काँग्रेसमध्ये दुसरा भूंकप! अशोक चव्हाण यांच्यानंतर काँग्रेस नेते अमर राजूरकर यांचा राजीनामा
काँग्रेसमध्ये दुसरा भूंकप! अशोक चव्हाण यांच्यानंतर काँग्रेस नेते अमर राजूरकर यांचा राजीनामा
img
Dipali Ghadwaje
 मुंबई :   राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांचा हा राजीनामा काँग्रेससाठी मोठा धक्काच असल्याचे म्हटले जात आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलेल्या राजीनाम्याच्या धक्क्यातून काँग्रेस अद्याप सावरलेली नसतानाच अशात काँग्रेसला आणखी एक मोठा झटका बसला आहे. माजी आमदार अमर राजूकर यांनीही काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. त्यांनी नाना पटोले यांना पत्र लिहून हा राजीनामा दिला आहे.

 काय म्हटलं आहे पत्रात ?

मी आज दिनांक 12/02/2024 पासून अध्यक्ष, नांदेड शहर ( जिल्हा) काँग्रेस कमिटी व उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदे काँग्रेस कमिटी आणि इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सादर करीत आहे. धन्यवाद. असं अमरनाथ राजूरकर यांनी त्यांच्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

इतर बातम्या