लालपरीचा प्रवास महागणार! एसटीचे तिकीट दर १० टक्क्यांनी वाढणार
लालपरीचा प्रवास महागणार! एसटीचे तिकीट दर १० टक्क्यांनी वाढणार
img
Dipali Ghadwaje
ऐन उन्हाळ्याच्या सुटीत गावाकडे जाण्यासाठी चाकरमान्यांची गर्दी होत असतानाच दुसरीकडे एसटी महामंडळाने एसटीच्या तिकीट दरात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील गावी जाण्याच्या तयारीत असाल आणि एसटीने प्रवास करायचा असेल तर तिकीटाचे जास्तीचे पैसे मोजावे लागतील. एसटी महामंडळाने एसटीच्या तिकीट दरात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

एसटी महामंडळाने हा निर्णय राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठवलाय. त्यास मंजुरी मिळाल्यास चाकरमान्यांच्या खिशावर याचा परिणाम होऊ शकतो. दरम्यान, सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे परिवहन प्राधिकरणाने निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन पुन्हा प्रस्ताव पाठविण्यास सांगितल्याची माहिती मिळाली आहे.

एसटी महामंडळाच्या महसुलात वाढ व्हावी यासाठी हंगामी भाडेवाढ दरवर्षी केली जाते. याच भाडेवाढीनुसार, उन्हाळी हंगामातील भाडेवाढीसाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. यंदाची भाडेवाढ १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीपर्यंत लागू असेल.

एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत सर्वच शाळांना सुट्ट्या पडतात. सुट्टी असल्याने नागरिक देव दर्शन, ट्रिप, पिकनीक, गावी जाणे असे विविध प्लान करतात. अशात गावाकडे जायचे असल्यास अनेक नागरिक एसटी बसचा पर्याय निवडतात.

एसटीचा प्रवास प्रत्येक सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडतो. मात्र आता तिकीच्या दरात १० टक्क्यांनी वाढ होणार असल्याने सामान्यांच्या खिशावर याचा भार येणार आहे.

bus | ST Bus |
इतर बातम्या
Join Whatsapp Group