एसटी प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. एसटीच्या दरात आता 14 टक्क्यांची भाडेवाढ होणार आहे. नवीन वर्षात या भाडेवाढीची अंमलबजावणी होणार आहे. तसे संकेत एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी दिले आहेत.
एसटीच्या 14 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. त्यामुळे शिवनेरीच्या दरात 70 रुपयांची वाढ होणार आहे. तर सध्या बसचा प्रवास 80 रुपयांनी महागणार आहे. सध्या एसटीकडे सुमारे १४ हजार बस आहेत. ज्यात २४० वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेस आहेत, तर ४९० वातानुकूलित शिवशाही बसेस आहेत. उर्वरित साध्या बसेस आहेत. यातून दिवसाला हजारोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात.
सध्या महामंडळाला दिवसाला 3 ते साडेतीन कोटींचा तोटा सहन करावा लागतो आहे. त्यामुळे हा भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगण्यात येत आहे. ही भाडेवाढ नव्या वर्षापासून लागू केली जाणार आहे. याबद्दलचे संकेत महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी दिले आहे.