मराठा आंदोलनाचे राज्यभर पडसाद ; एसटी बससेवा कोलमडली, प्रवाशांचे हाल
मराठा आंदोलनाचे राज्यभर पडसाद ; एसटी बससेवा कोलमडली, प्रवाशांचे हाल
img
Dipali Ghadwaje
 जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या घटनेनंतर आता याचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहे. दरम्यान या घटनेनंतर राज्यभरातील बससेवा कोलमडली आहे. विविध जिल्ह्यांमध्ये किती बस सोडण्यात आल्यात तसेत किती बस रद्द करण्यात आल्यात. कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती आहे याची माहिती जाणून घेऊ.  

हिंगोलीमध्ये आगार व्यवस्थापनाने आगारातील ६३ बसेसच्या एकूण ३७० बस फेऱ्या रद्द केल्या आहेत. या संपूर्ण बसेस आगारामध्येच उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत.

दरम्यान, पुढील आदेशापर्यंत ही संपूर्ण बस वाहतूक व्यवस्था बंद ठेवण्यात येणार असल्याचे देखील प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. अहमदनगर जिल्ह्यात महामंडळाची बससेवा ठप्प झाली आहे. शिर्डी बस स्थानकावर प्रवासी, साईभक्त आणि विद्यार्थ्यांचे हाल होतायत. मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जमुळे आंदोलकांनी रात्री बसेसची जाळपोळ केली होती.

परिवहन विभागाकडून खबरदारी म्हणून बससेवा बंद करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी, राहता, कोपरगाव, अकोले,संगमनेर, श्रीरामपूर, नेवासा या बस स्थानकावरील बस बंद आहेत. शिर्डी बस स्थानकावर येणाऱ्या साई भक्तांचे बस बंद असल्याने हाल झालेत. शिर्डी बस स्थानकावर दररोज राज्यभरातून येणाऱ्या ३२४ बससेची ये जा होतेय.
 
पुणे विभागातील सर्व एसटी बसेसची सेवा सुरू आहे. पुणे विभागातून सुटणाऱ्या एसटी महामंडळाच्या सर्व गाड्या वेळेवर आहेत. जालनामध्ये झालेल्या प्रकरणाचा पुण्यातील एसटी बस सेवेवर अद्याप परिणाम झालेला नाही. पुण्यातून निर्धारित स्थळी जाणाऱ्या सर्व बसेस सुरू आहेत. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्या, असे आदेश राज्य परिवहन मंडळाने राज्यातील सर्व आगारांना आदेश दिलेत.

काल शहागड आणि धुळे, सोलापूर महामार्गावर आंदोलकांनी एसटी बसची जाळपोळ केल्याच्या पार्श्वभूमीवर हे आदेश देण्यात आलेत. सध्या नाशिकहून छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नंदुरबार एसटी बस सेवा बंद आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group