VIDEO: धक्कादायक! एका हातात स्टेअरिंग अन् दुसऱ्या हाताने हुक्का ओढत चालक चालवतोय बस ; पहा व्हिडीओ
VIDEO: धक्कादायक! एका हातात स्टेअरिंग अन् दुसऱ्या हाताने हुक्का ओढत चालक चालवतोय बस ; पहा व्हिडीओ
img
DB
रस्त्यावरुन वाहन चालवताना चालकाने सावधगिरी बाळगणे फार गरजेचे असते, अन्यथा भीषण अपघात होण्याची शक्यता असते. यासाठी सरकारनेही वाहतुकीसंदर्भात अनेक नियम केले आहेत. ज्याचे प्रत्येक वाहन चालकाने पालन करणे बंधनकारक असते. पण काही चालक हे नियम गांभीर्याने न घेतला धोकादायक पद्धतीने गाडी चालवतात आणि स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात घालतात. 

सध्या असाच एका बस चालकाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात तो चालक चक्क गाडी चालवताना हुक्का ओढत असल्याचे दिसतेय. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसलाय.

व्हिडीओत बस चालक एका हातात गाडीचे स्टेअरिंग आणि दुसऱ्या हाताने हुक्क्याचा पाईप पडून खुलेआमपणे हुक्का ओढतोय. हा व्हिडीओ हरियाणामधील असल्याचे सांगितले जात आहे. 

या व्हायरल व्हिडीओत एक मोठी बस रस्त्यावरुन भरधाव वेगाने जाताना दिसतेय. पण जेव्हा व्हिडीओ बनवणारी व्यक्ती बसच्या ड्रायव्हरकडे कॅमेरा नेते तेव्हा बघणारे सगळेच अवाक् झाले. कारण बसचालक एका हाताने बसचे स्टेअरिंग आणि दुसऱ्या हातात हुक्काचा पाईप धरुन ओढतोय. बस चालवताना अशाप्रकारे नशा करणे चालक आणि प्रवाशांच्या जीवासाठी देखील धोकादायक आहे, तरी कसलीही भीती न बाळगता ड्रायव्हर खुलेआमपणे हुक्का ओढताना दिसतोय.

पहा व्हिडीओ : 

हा धक्कादायक व्हिडीओ @HasnaZaruriHai नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना अकाऊंट यूजरने ही हरियाणा रोडवेज बस असल्याचे सांगितले आहे. व्हिडिओमध्ये बसवरही ‘हरियाणा रोडवेज दिल्ली’ असे लिहिलेले दिसत आहे. याशिवाय बसचा क्रमांकही व्हिडिओमध्ये लिहिलेला दिसत आहे.  
bus |
इतर बातम्या
Join Whatsapp Group