तरुणाच्या हत्येचे उमटले पडसाद ; नंदुरबार जिल्ह्यात कडकडीत बंद
तरुणाच्या हत्येचे उमटले पडसाद ; नंदुरबार जिल्ह्यात कडकडीत बंद
img
दैनिक भ्रमर
नंदुरबार जिल्ह्यात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. दोन दिवसांपूर्वी नंदुरबार शहरातील मार्केट परिसरात भररस्त्यावर चाकूने हल्ला करत तरुणाची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आरोपीला कडक शिक्षा व्हावी या मागणीसाठी नंदुरबार जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.

नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी परिसरात भैय्या मराठे नामक युवकाने जय भिल या तरुणावर चाकुने प्राणघातक हल्ला केला होता. त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला उपचारासाठी सुरत येथे हलविण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तरुणाच्या मृत्यूनंतर आदिवासी समाज बांधव आक्रमक झाले असून घटनेच्या तिसऱ्या दिवशी देखील नंदुरबार शहरात तणावाचे वातावरण पहायला मिळाले. 

जय भील याची हत्या झाल्यानंतर शहरात तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आदिवासी समाज बांधवांकडून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी; या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. यानंतर पोलीस देखील ऍक्शन मोडमध्ये आले असून अखेर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून आज त्याची शहरातून धिंड काढण्यात आली आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group