बळीराजा सतत कुठल्या ना कुठल्या संकटाला तोड देत आहे. कधी आर्थीक संकट तर कधी निसर्गाचा कोप. धाराशिव मध्ये झालेल्या गारपिटीमुळे शेतकरी आता पुन्हा एकजदा मोठ्या संकटात सापडला आहे.
धाराशिव जिल्ह्याला पुन्हा एकदा वादळी वारा आणि गारपीटचा तडाखा बसला असून काल रात्री धाराशिव तालुक्यातील धारूर केशेगाव बामणी या परिसरात मोठी गारपीट झाली धारूर गावात तर चक्क रस्त्यावरती गाराचा सडा पडून संपूर्ण रस्ता गारांचा बनला होता तर वावरात देखील गारा पडल्याने काळीभोर जमीन बर्फान आच्छादल्यासारखी दिसत होती हा जणू कश्मीर किंवा महाबळेश्वर आहे असे वातावरण काही काळ निर्माण झाले होते हे वातावरण मनाला थोडा दिलासा देणारा जरी असलं तरी या गारपीटीने गावातील आंबा केळी द्राक्षे काढणीला आलेली ज्वारी कांदा या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्याला आर्थिक फटका बसला आहे.
राज्यात सध्या अवकाळी पावसाचं तांडव सुरू असून धाराशिव जिल्ह्याला पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह गारपिटीने झोडपून काढलं आहे. काल रात्री जिल्हयातील अनेक भागांत निसर्गाचं एक वेगळंच रूप पाहायला मिळालं. धाराशिव तालुक्यातील धारूर, केशेगाव आणि बामणी परिसरात भीषण गारपीट झाली हे दृश्य शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारं होतं. धारूर गावात काल रात्री झालेल्या गारपिटीने सर्वांनाच थक्क केलं.
चक्क रस्त्यांवर गारांचा खच पडल्याने संपूर्ण रस्ता पांढराशुभ्र झाला होता. इतकंच नाही, तर शेतातील काळीभोर जमीन गारांनी पूर्णपणे झाकून गेल्याने जणू बर्फाची चादर पसरल्यासारखी दिसत होती. ही गारपीट केवळ निसर्गाचा चमत्कार नव्हती, तर तो शेतकऱ्यांवर कोसळलेला मोठा आघात आहे. या गारपिटीमुळे परिसरातील आंबा, केळी आणि द्राक्षांच्या बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच काढणीला आलेली ज्वारी आणि कांदा ही पिके पूर्णपणे आडवी झाली.
पावसामुळे आणि गारांच्या माऱ्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा आर्थिक संकट ओढवले आहे. परिसरात अगदी पावसाळ्यासारखा जोरदार पाऊस झाला. पावसासोबत आलेल्या सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे गावातील अनेक ठिकाणी विजेचे खांब तुटून पडले आहेत.
यामुळे अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने आधीच गारपिटीचा अंदाज वर्तवला होता आणि तो दुर्दैवाने खरा ठरला आहे. निसर्गाच्या या प्रकोपानंतर आता धाराशिवचा शेतकरी पूर्णपणे खचला आहे. "वर्षभर कष्ट करून जे पीक हाताशी आलं होतं, ते एका रात्रीत मातीमोल झालं," अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. आता शासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करावेत आणि ओला दुष्काळ किंवा विशेष मदत जाहीर करावी, अशी आर्त हाक बळीराजा मारत आहे.