ऑडी कार आणि होंडा सिटी कर मध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली असून या अपघात पती पत्नीला आपला जीवगमवावा लागला आहे. जळगावमध्ये हा भीषण अपघात झाला आहे. पारोळ्यातील म्हसवे फाट्या जवळ दोन कारची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात पती आणि पत्नी जागीच ठार झाले आहे. तर चार जण जखमी झाले आहे. जखमींना पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पारोळ्यातील म्हसवे फाट्याजवळ हा अपघात झाला आहे. जळगावकडून येणाऱ्या ऑडी कारने पारोळ्यातील म्हसवे फाट्यावर वळण घेत असलेल्या एका होंडा सिटी कारला जोरदार धडक दिली. कारचा वेग असल्यामुळे जोराचा आवाज झाला. होंडा सिटी कार दूरपर्यंत फेकली गेली. या अपघातात कारमध्ये असलेले पती आणि पत्नी जागीच ठार झाले. या अपघातात ज्योती सुधीर पाटील, सुधीर देविदास पाटील जागीच ठार झाले. हे कुटुंब होंडा सिटी J j 05आर 1247 नंबरच्या गाडीने सुरतहुन पारोळा तालुक्यातील लोणी बु. येथे चुलत भावाच्या मुलीच्या लग्नासाठी जात होते.
पण वळणावर म्हसवे फाट्यावर जळगावकडून समोरून येणारी ऑडी क्रमांक डीडी 03के 6906 ने जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की, होंडा कारचा पार चुराडा झाला.
दरम्यान , यात नाशिक येथील शिरीष लठ्ठा, उमेश लाने, चालक प्रवीण तागड, मिरज चांदे हे ऑडी मधील नागरिक जखमी झाले आहे. त्यांना पारोळा कुटीर रुग्णालय इथं हलवण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच लोणी, म्हसवे परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. घटनास्थळी पोलीस पोहोचले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवलं आहे.