छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या धूळे-सोलापूर महामार्ग रस्त्यावर माळीवाडा-फातियाबाद परिसरात अपघाताची भीषण घटना घडली आहे. भरधाव कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची मिळत आहे. भीषण अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील धुळे-सोलापूर हायवे रस्त्यावरील माळीवाडा-फातियाबाद येथे झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा अपघात झाल्याची घटना घडली आहे.
भरधाव कारने उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. या अपघातात मृत झालेले तिघेही लोक बजाजनगर भागात राहत असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
कन्नडवरून छत्रपती संभाजीनगरकडे येताना अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. अलकाबाई राजू उचित, राजू आत्माराम उचित आणि अर्जुन राजू उचित या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. या तिघांचा मृत्यू झाल्याने उचित कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिघांच्या मृत्यूने बजाजनगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.