पोर्शे कारप्रकरणातील
पोर्शे कारप्रकरणातील "या" व्यक्तींना न्यायालयाकडून जामीन मंजूर
img
Jayshri Rajesh
पुण्यातील कल्याणी नगरमधील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. अग्रवाल याच्यावर दाखल असलेल्या तीन पैकी दोन गुन्ह्यात त्यांना जामीन मंजूर झाल्याने त्याची तुरुंगातून सुटका होणार होती.

आणखी एका गुन्ह्यात कोठडीत असल्याने आरोपी विशाल अग्रवालचा मुक्काम तुरुंगातच असणार आहे.अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवालचा बाहेर येण्याचा मार्ग न्यायालयाच्या या निर्णयामुळे मोकळा झालाय.  

ड्रायव्हर गंगाराम पुजारीला डांबून ठेवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र विशाल अग्रवालवर ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी हाताशी धरुन अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा आणखी एक गुन्हा नोंद आहे.  

या  प्रकरणात विशाल आणि शिवानी अग्रवाल हे पती पत्नी येरवडा कारागृहात आहेत. त्यामुळे विशाल अग्रवालची येरवडा कारागृहातून लगेच सुटका होणार नाही. मात्र सुरेंद्र कुमार आगरवालचा बाहेर येण्याचा मार्ग न्यायालयाच्या या निर्णयामुळे मोकळा झाला आहे. 19 मे रोजी पुण्यातील कल्याणी नगर चौकात भरधाव येणाऱ्या पोर्शे कारखाली चिरडून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी गाडी चालवत असलेल्या अल्पवयीन मुलासह त्याच्या आई-वडिलांसह आजोबांवरही पोलिसांनी  गुन्हा दाखल केला आहे.अग्रवाल कुटुंबीयांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले असून सध्या अख्ख कुटुंब न्यायालयीन कोठडीत आहे.   

 पुणे पोलिसांकडून विशाल अग्रवालवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कलम 201 अंतर्गत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचाही गुन्हा त्याच्यावर दाखल आहे.  

पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा आणि आरटीओच्या तक्रारीचेही गुन्हे दाखल आहेत. आरटीओच्या तक्रारीनंतर कलम 420 च्या अंतर्गत दुसरा गुन्हा विशाल अग्रवालवर दाखल झाला आहे. तसेच, बिल्डर असल्याने जागेच्या व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणीही अग्रवालवर गुन्हा दाखल आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group