राज्यात अनेक ठिकाणी आज आणि उद्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता ;  तुमच्या जिल्ह्यात कसं असेल हवामान?
राज्यात अनेक ठिकाणी आज आणि उद्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता ; तुमच्या जिल्ह्यात कसं असेल हवामान?
img
Dipali Ghadwaje
पुणे : उत्तर पश्चिम भारतात पुढच्या 24 तासात कमाल तापमानात कोणताही बदल होणार नाही. मात्र पुढचे 3 दिवस तापमान वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्य भारत आणि महाराष्ट्रात पुढचे तीन दिवस किमान तापमानात 3 डिग्री सेल्सियसने वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.

त्यामुळे थंडीचा कडाका कमी होणार असून उष्णता वाढेल. त्यानंतर पुढचे तीन दिवस तरी हवामानात कोणताही बदल होणार नाही असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला.

राज्यात गारठा कमी झाला मात्र धुकं उशिरापर्यंत राहातं. तर काही भागांमध्ये अंशत: ढगाळ हवामान असल्याने फळभागा आणि शेतीला मोठा फटका बसला आहे.

उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहिल्यामुळे तापमानात वाढ होईल असा अंदाज आहे. मराठवाड्यात काही भागांमध्ये तुरळक पावसाच्या सरी देखील पडू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अलर्ट दिला आहे.

अग्नेय अरबी समुद्रामध्ये सायक्लोनिक सर्क्युलेशनसारखी स्थिती निर्माण झाल्यामुळे त्याचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावरही झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रात ,उत्तर महाराष्ट्रसह आज मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता असल्याचं पुणे वेधशाळेनं अंदाज वर्तवला.

राज्यातील अनेक जिल्ह्यातून थंडी देखील गायब झालीय. ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात अनेक ठिकाणी आज आणि उद्या पावसाच्या सरी बरसणायची शक्यता आहे.

उत्तर भारतात 110 नॉट्स वेगाने वारे तर पश्चिमेकडूनही जोरदार वारे वाहात आहेत. पश्चिमी वाऱ्यांमुळे थंडी कमी जास्त होत आहे. मध्येच थंडी आणि मध्येच वाढलेली उष्णता अशी विचित्र स्थिती सध्या निर्माण झाली आहे. विदर्भातील काही भागांमध्ये उद्या अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group