अजित पवार गटाला खिंडार! शहराध्यक्षासह 600 जणांचे राजीनामे , नेमकं काय कारण?
अजित पवार गटाला खिंडार! शहराध्यक्षासह 600 जणांचे राजीनामे , नेमकं काय कारण?
img
Dipali Ghadwaje
राज्यात विधानसभा निवडणुकांचं बिगूल वाजलं असून मंगळवारी निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. २० नोव्हेंबर रोजी बुधवारी मतदान पार पडणार असून २३ नोव्हेबर रोजी शनिवारी राज्यात विधानसभेचा निकाल जाहीर होईल. अशातच राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार गटाच्या पुणे शहराध्यक्षासह तब्बल 600 जणांनी राजीनामा दिला आहे.

अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दिपक मानकर हे नाराज झाले आहेत. राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदारकी न दिल्याने त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे, त्यांच्यासोबत पुणे शहरातील अजित पवार गटाच्या तब्बल 600 जणांनी राजीनामा दिला आहे. नुकतंच याबद्दल अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दलची घोषणा केली.

मी 2012 पासून पक्षाचं काम करतोय. गेले 14 महिने शहर अध्यक्ष म्हणून काम करतोय. राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून संधी मिळावी, अशी मागणी पदाधिकारी यांनी केली होती. पंकज भुजबळ, इद्रिस नाईकवडे यांना संधी दिली. मग मला नाकारण्याचं कारण काय? मला इतर माणसासारखं पुढे पुढे करता येत नाही. कार्यकर्त्यांनी स्वतःहून राजीनामे दिले आहेत. मी स्वतः राजीनामा देतो. कार्यकर्त्यांनी राजीनामा माघारी घ्यावे.  

भुजबळ साहेबांच्या घरात सगळी पद दिली तर इतर कार्यकर्त्यांना संधी कधी देणार. मी शनिवारपर्यंत हा राजीनामा अजित पवारांकडे देणार आहे. दीपक मानकरांना विधान परिषदेवर संधी मिळावी अशी मागणी पुणे शहरातील कार्यकर्त्यांनी केली होती. अजित पवारांच्या हातात हे सगळं असून पंकज भुजबळ यांना संधी दिली पण मला मात्र डावलले? अशा शब्दात अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group