प्रवाशाला विमानात सिगारेट ओढणं पडलं महागात; नेमकं काय घडलं? वाचा
प्रवाशाला विमानात सिगारेट ओढणं पडलं महागात; नेमकं काय घडलं? वाचा
img
Dipali Ghadwaje
इंडिगो एअरलाइन्स विमानात एक धक्कदायक घटना घडली आहे. विमानात ज्वलनशील ज्वलनशील पदार्थ नेण्यास किंवा सिगारेट ओढण्यास बंदी असतानाही दिल्लीहून पुण्याकडे येणाऱ्या विमानात एका प्रवाशाने स्वच्छतागृहात जाऊन सिगारेट ओढत मद्यपान केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने सिगाराट ओढल्याचा प्रकार समोर आलाय. सिगारेट ओढणाऱ्या त्या तरुणाच्या विरोधात पुण्यात विमातळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रतीक पावले असे फिर्याद दिलेल्या व्यक्तीचे नाव आहे.  विमानात सिगारेट पिणाऱ्या तरुणाचे नाव नक्षब जहांगीर (वय ३८, रा. ओखला विहार नवी दिल्ली, सध्या रा. बाणेर) असे आहे. इंडिगो एअरलाइन्स विमानात ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रतीक हे इंडिगो एअरलाईनमध्ये सिक्युरिटी एक्सिक्युटिव्ह आहेत. ९ सप्टेंबरच्या रात्री जहांगीर हे इंडिगोच्या विमानाने दिल्ली ते पुणे प्रवास करत होते. यावेळी विमान हवेत असताना सूचना देवूनही त्यांनी निष्काळजीपणे बाथरूमध्ये जावून सिगारेट ओढली. अखेर विमान पुण्यात उतरल्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुणे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सुरक्षेच्या कारणास्तव विमानातून ज्वलनशील पदार्थ नेण्यास आणि सिगारेट ओढण्यास बंदी आहे. याची माहिती असतानाही प्रवाशी जहांगीर याने विमान हवेत असताना स्वच्छतागृहात जाऊन सिगारेट ओढली. त्याच्यावर आता विमान अधिनियम १९३७ च्या कलम ३७ नुसार आणि भारतीय न्यायसंहितेच्या १२५ कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group