दिल्लीमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. दिल्लीत पतीला मारहाण करुन, पत्नीचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर त्यांनी त्यांच्या मुलाला रस्त्यावर नग्न करुन मारहाण केली. लक्ष्मी नगरमध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दिल्लीच्या लक्ष्मीनगर येथे वडील आणि मुलाला भररस्त्यात निर्वस्त्र करत बेदम मारहाण करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, पूर्व दिल्लीतील लक्ष्मी नगर भागात ५२ वर्षीय पीडित राजेश गर्ग यांची जिम आहे. या जिमवर आरोपींनी कब्जा केला. त्यानंतर राजेश गर्ग आणि त्यांचा २६ वर्षीय मुलगा वासू यांना नग्न करून अमानुष मारहाण केली. या हल्ल्यादरम्यान आरोपींनी राजेश गर्ग यांच्या बायकोला शिवीगाळ करत आरोपींनी कुटुंबातील महिले असभ्य वर्तन केले. घटनेनंतर सर्व आरोपी पळून गेले. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जानेवारी रोजी दुपारी ही घटना घडली. राजेश यांच्या बायकोने यासंदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीत त्यांनी सांगितले की, त्यांच्या घराच्या तळघरात एक जिम उघडली होती. या ठिकाणी सतीश यादव नावाच्या व्यक्तीला जिमची देखभाल करण्यासाठी कामावर ठेवले होते. काही काळानंतर सतीशने जिमचा ताबा घेतल्याचा आरोप आहे. पीडितेच्या कुटुंबाने ताबा परत घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपींनी भांडणे सुरू केली.
तक्रारीनुसार, आरोपी सतीशसोबत जिममध्ये १५ ते २० मुले राहतात आणि त्यांना शिवीगाळ आणि त्रास देतात. २ जानेवारी रोजी सीवर लाइन ब्लॉक झाल्यामुळे घरात पाणी साचले होते. या सीवरचे कनेक्शन जिम बांधलेल्या बेसमेंटमध्ये आहे. राजेश गर्ग आणि त्यांची बायको बेसमेंटमध्ये जाऊ लागले. यावर तिथे उपस्थित असलेल्या एका मुलाने सतीशला फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनी महिलेच्या नवरा आणि मुलाला मारहाण करण्यास सुरूवात केली.
आरोपींनी तक्रारदार महिलेचा नवऱ्याला नग्न केले आणि जिमच्या रॉडने मारहाण केली. पीडत महिलेशी गैरवर्तन केले आणि तिला असभ्य वागणूक दिली. पीडित महिलेच्या नवऱ्याने तिला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. यादरम्यान आरोपी त्यांच्या घरात घुसले आणि त्यांचा मुलगा वासूला रस्त्यावर ओढत नेले त्याची पँट काढली आणि त्यालाही मारहाण केली. हा मारहाणीचा प्रकार स्थानिक नागरिक पाहत होत पण कुणीच त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. त्यानंतर आरोपी पळून गेले.
पोलिसांनी घटनास्थळी धाव धेत जखमी झालेल्या कुटुंबाला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विकास यादव, शुभम यादव, ओंकार यादव आणि पिंटू यादव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका आरोपीला अटक करण्यात आली तर उर्वरीत आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.