मोठी अपडेट! पक्ष आणि चिन्ह कुणाचं? '२ आठवड्यात उत्तर द्या', सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला निर्देश
मोठी अपडेट! पक्ष आणि चिन्ह कुणाचं? '२ आठवड्यात उत्तर द्या', सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला निर्देश
img
Dipali Ghadwaje
दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाच्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आज सर्वोच्च न्यायालयामध्ये झालेल्या सुनावणीमध्ये अजित पवार गटाला दोन आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

याप्रकरणी पुढील सुनावणी ६ ऑगस्टला होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

याप्रकरणी शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला महत्वाचे निर्देश दिले आहे.

या प्रकरणात अजित पवार गटाने दोन आठवड्यात उत्तर सादर करावे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. तसेच अजित पवारांच्या उत्तरावर जर शरद पवार यांना प्रतिवाद सादर करायचे असल्यास एक आठवड्यात शरद पवारांनी ते दाखल करावे, असेही कोर्टाने म्हटले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑगस्टला होणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group