भरधाव मर्सिडीज शिरली थेट कचोरीच्या दुकानात; ६ जण जखमी
भरधाव मर्सिडीज शिरली थेट कचोरीच्या दुकानात; ६ जण जखमी
img
दैनिक भ्रमर
भरधाव वेगात गाडी चालवताना अनेक घटना घडल्याचे पाहण्यात येते. अशीच एक धक्कादायक दिल्लीत घडली आहे.

एक भरधाव मर्सिडीज कार थेट कचोरीच्या दुकानात शिरल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जण जखमी झाल्याचे समजते.

अपघात झाला तेव्हा या दुकानात काही लोक कचोरी खात होते. त्यांना भरधाव कारने धडक दिल्याने ते जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.  मर्सिडीज कार चालकाचे नाव पराग मैनी (वय 36, रा. नोएडा) असे आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये ही कार अचानक येऊन धडकताना दिसते. या घटनेत एक महिला गंभीररित्या जखमी झाली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.


फतेहचंद कचोरी विक्रेत्याच्या दुकानात कार घुसल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेनंतर पोलिसांनी कार जप्त केली असून चालक पराग मैनीला अटक केली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group