राजधानी दिल्लीमधून मोठी दुर्घटना समोर आली आहे. नवी दिल्ली- जवाहरलाल नेहरू स्टेडियम गेट क्रमांक 2 मधून प्रवेश करताना मंडप कोसळल्याची माहिती मिळत आहे. यात अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येतीये. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार , आत्तापर्यंत या दुर्घटनेत ८ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या प्रवेशद्वार क्रमांक-2 वर एक मंडप कोसळला आहे. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. गेट क्रमांक 2 जवळील लॉनमध्ये काम सुरू असून, बांधकामादरम्यान एक भाग पडला असल्याचे सांगण्यात येत आहे.
या मंडपाखाली अनेकजण अडकल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळी 11.35 च्या सुमारास अपघाताची माहिती पोलीस व इतर पथकांना देण्यात आली. त्यानंतर बचावकार्यासाठी पोलीस आणि अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहोचले. आत्तापर्यंत ८ जण या दुर्घटनेत जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान,या अपघातातील एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, तो जेएलएन स्टेडियममध्ये गार्ड म्हणून काम करतो. तेथे पंडाल उभारण्याचे काम सुरू होते. यावेळी काही कामगार तेथे जेवण करत असताना अचानक पँडल कोसळले आणि ते सर्वजण त्याखाली गाडले गेले.