प्रजासत्ताक दिनानिमित्त PM मोदींकडून देशवासियांना शुभेच्छा ; काय म्हणाले PM नरेंद्र मोदी
प्रजासत्ताक दिनानिमित्त PM मोदींकडून देशवासियांना शुभेच्छा ; काय म्हणाले PM नरेंद्र मोदी
img
Dipali Ghadwaje
देशभरात ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. ठिकठिकाणी ध्वजारोहन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली जात आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त आज देशभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच पद्म पुरस्कार विजेत्यांचेही अभिनंदन केलं आहे. मोदींनी आपल्या अधिकृत X अकाउंटवरून (पूर्वीचे ट्विटर) ट्वीट करत आपल्या  भावना व्यक्त केल्या आहेत. 

काय म्हणाले PM नरेंद्र मोदी?

"देशातील आपल्या सर्व कुटुंबियांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद", अशी पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. तसेच त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांच्या मान्यवरांचंही अभिनंदन केलं आहे. 

"पद्म पुरस्कारानं सन्मानित झालेल्या सर्वांचे अभिनंदन. भारत विविध क्षेत्रात त्यांच्या योगदानाची कदर करतो. ते त्यांच्या असामान्य कार्याने लोकांना प्रेरणा देत राहोत, हीच अपेक्षा", असं ट्वीट पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group