“जेलमधून सरकार चालवणार, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा नाही देणार” - अरविंद केजरीवाल
“जेलमधून सरकार चालवणार, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा नाही देणार” - अरविंद केजरीवाल
img
Dipali Ghadwaje
शंभर कोटींच्या कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याचे ‘सूत्रधार’ दिल्लीचे मुख्यमंत्रीअरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीकडून अटक करण्यात आली. पीएमएलए न्यायालयाने २८ मार्चपर्यंत ईडी कोठडीत रवानगी केली आहे, आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते यामुळे आक्रमक झाले. इंडिया आघाडीतील विरोधी पक्षांनीही अरविंद केजरीवाल यांच्यावरील कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

काय म्हणाले अरविंद केजरीवाल? 
दरम्यान मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाही. जेलमधूनच सरकार चालवणार, असा ठाम निर्धार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. दिल्लीच्या जनतेचीही तीच इच्छा आहे. काही झाले तरी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाही. जेलमधूनच सरकार चालवण्याचा प्रयत्न करणार आहे. अनेक अडचणी येतील, याची मला पूर्ण कल्पना आहे. मात्र, इथूनच काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. माझी प्रकृती एकदम ठणठणीत आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर लगेचच इतक्या तातडीने ईडी मला अटक करण्यासाठी घरी येईल, असे वाटलेच नाही. मला अटक करण्यासाठी ईडीला दोन ते तीन दिवस लागू शकतील, असे मला वाटले. आई-वडिलांचा आशिर्वाद घेण्याची संधीही मिळाली नाही, अशी प्रतिक्रिया अरविंद केजरीवाल यांनी दिली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group