अरविंद केजरीवालांच्या अडचणीत वाढ; दारू घोटाळ्याप्रकरणी
अरविंद केजरीवालांच्या अडचणीत वाढ; दारू घोटाळ्याप्रकरणी "ही" महत्वाची माहिती आली समोर
img
Dipali Ghadwaje
दिल्ली कथित दारू घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ईडीने त्यांच्याविरोधात मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी चार्जशीट तयार केली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळालीये. त्यामुळे ईडीकडून केव्हाही न्यायालयात आरोपपत्र दाखल केले जाऊ शकते.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अरविंद केजरीवाल यांच्यासह बीआरएस नेत्या के. कविता यांच्याविरोधात देखील आरोपपत्र दाखल केले जाऊ शकते. यासह आपच्या अन्य काही नेत्यांच्या नावाचा समावेश आरोपपत्रात असू शकतो.
 
कथित मद्य घोटाळा प्रकरणी ईडीने केलेल्या कारवाईत अरविंद केजरीवाल यांच्यासह अन्य आरोपी सध्या तिहार तुरूंगात आहेत. यातील अनेकांवर आतापर्यंत चार्जशीट दाखल करण्यात आले आहे. 15 एप्रिल रोजी अटक करण्यात आलेले कार्यकर्ता चनप्रीत सिंग यांचेही नाव चार्जशीटमध्ये असू शकते. एएसजी राजू यांनी याबाबत संकेत दिले होते.

एएसजी राजू काय म्हणाले?

एएसजी राजू यांनी सुप्रीम कोर्टात मनीष सिसोदिया यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी सुरू असताना तपास यंत्रणा आम आदमी पार्टीलाही या प्रकरणात आरोपी बनविण्याचा विचार करत आहे, असं म्हटलं होतं. तसेच ईडी आम आदमी पार्टीला मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या कलम 70 अंतर्गत या प्रकरणात आरोपी बनवेल. आमच्याकडे 'आप'च्या विरोधात पुरावे आहेत, असंही न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि एसव्ही भाटी यांच्या खंडपीठासमोर एएसजी राजू यांनी सांगितले होते.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group