आप अध्यक्ष, दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात ईडी कोठडीत आहेत. दरम्यान त्यांनी ईडीच्या कोठडीतून दिल्लीच्या जल विभागाला आदेश जारी केले आहेत. केजरीवालांचा हा आदेश जलमंत्री आतिशी यांनी वाचून दाखवला.
मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ईडीच्या ताब्यातून दिल्लीच्या पाणी आणि गटार व्यवस्थेबाबत जलमंत्र्यांना सूचना दिल्या. ते म्हणाले की, ईडीच्या कोठडीत असताना अनेक भागात पाणी आणि गटाराची समस्या निर्माण झाल्याचे त्यांना समजले. त्यामुळे ही समस्या सोडवण्यासाठी पावले उचलली पाहिजेत.
याबाबत जलमंत्र्यांनी मुख्य सचिवांसह सर्व अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत. लेफ्टनंट गव्हर्नर यांचे सहकार्य घेतले पाहिजे. ते या प्रकरणात नक्कीच मदत करतील, अशा सूचना मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ईडी कोठडीतून दिलेल्या आदेशात सांगितले आहे.