दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज दिलासा मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. त्यांच्या अटकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायमुर्ती संजीव खन्ना आणि दिपांकर दत्ता हे केजरीवाल यांच्या अटकेवर सुनावणी करणार आहेत. केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने आपची याचिका फेटाळून लावल्यानंतर आपने सर्वोच्च न्यायालयात अपिल केलं होतं. केजरीवाल यांची अटक योग्य असल्याचं दिल्ली उच्च न्यायालयाने ९ एप्रिलच्या निकालात म्हटलं होतं. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अटक बेकायदेशीर आहे, अशी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली
मात्र, न्यायालयाने ही याचिका ९ एप्रिलला फेटाळली होती. त्यानंतर केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात अपिल केलं आहे.सुनावणीवेळी केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी ही अटक एक षडयंत्र असून ही अटक स्क्रिप्टेड असल्याचा आरोप केला होता. अरविंद केजरीवाल यांना दिल्लीतील राहत्या घरातून 21 मार्च रोजी अटक करण्यात आली होती. अरविंद केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी न्यायालयामध्ये सरकारी साक्षीदारांवर संशय व्यक्त केला होता. त्यावर न्यायालयाने , न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर सरकारी साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेलेत. त्यामुळे साक्षीदारांच्या जबाबांना महत्त्व आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे, असं न्यायालयाने म्हटलं होतं. न्यायालय कोणत्याही मुख्यमंत्र्यासाठी वेगळा कायदा करू शकत नाही, असंही म्हटलं होतं.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात आहेत. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगातच राहणार की दिलासा मिळणार? यावर आज निर्णय होणार आहे. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या वेळेवर त्यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. केजरीवाल यांच्या अटकेपुर्वी इडीने केजरीवाल यांना ९ समन्स पाठवले होते. मात्र, त्याला हजर न राहिल्याने केजरीवाल यांना ED ने अटक केली होती. केजरीवाल यांचा कथित दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंध असल्याचा युक्तिवाद ED ने केला होता. आज ED कडून पुन्हा केजरीवाल यांच्या न्यायालयिन कोठडीची मागणी केली जाऊ शकते.