ऑनलाइन जुगार अ‍ॅप्सची जाहिरात महागात ; गुगल आणि मेटाला ईडीचे समन्स; नेमकं काय प्रकरण?
ऑनलाइन जुगार अ‍ॅप्सची जाहिरात महागात ; गुगल आणि मेटाला ईडीचे समन्स; नेमकं काय प्रकरण?
img
Dipali Ghadwaje
ऑनलाइन सट्टेबाजी अ‍ॅप्सशी संबंधित चौकशीचा एक भाग म्हणून गुगल आणि मेटा या टेक कंपन्यांना नोटीस बजावली आहे. 29 हायप्रोफाईल सेलिब्रिटी आणि इन्फ्लुएंसर्सवर यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप्सना प्रोत्साहन दिल्याच्या आरोपावरून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुगल आणि मेटा यांना नोटीस पाठवल्या आहेत. या कंपन्यांना २१ जुलै रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

ईडीचे म्हणणे आहे की, या प्लॅटफॉर्म्सनी बेटिंग अ‍ॅप्सना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. त्यांच्या जाहिराती आणि वेबसाईटला डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर प्राधान्य दिलं जात आहे. ज्यामुळे बेकायदेशीर प्रकल्पांना प्रोत्साहन मिळाले. ही चौकशी मनी लाँड्रिंगसारख्या गंभीर आर्थिक गुन्ह्यांशी संबंधित आहे.

ऑनलाईन जुगार प्रकरणी पहिल्यांदाच भारतातील काम करणाऱ्या सर्वात मोठ्या टेक कंपनीला ईडीकडून थेट नोटीस पाठवण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात ईडीने २९ सेलिब्रिटींवर कारवाई केली. यामध्ये अभिनेता विजय देवरकोंडा, राणा दग्गुबती, प्रकाश राज, निधी अग्रवाल, प्रणिता सुभाष, मंचू लक्ष्मी आणि अनन्या नागेला यांचा समावेश आहे.

याशिवाय श्रीमुखी, श्यामला, वर्षानी सौंदर्यराजन, वासंती कृष्णन, शोभा शेट्टी, अमृता चौधरी, नयनी पवानी, नेहा पठाण, पांडू, पद्मावती, हर्षा साई आणि बय्या सनी यादव यांसारख्या टीव्ही कलाकार, होस्ट आणि सोशल मीडियावर प्रभाव टाकणाऱ्यांचीही चौकशी सुरू आहे. त्यांच्यावर जंगली रम्मी, ए२३, जीतविन, परिमॅच आणि लोटस ३६५ सारख्या प्लॅटफॉर्मचा प्रचार केल्याचा आरोप आहे, जे मनी लाँड्रिंगमध्ये गुंतलेले आहेत.

ईडी ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप्सच्या मोठ्या नेटवर्कची बारकाईने चौकशी करत आहे. अनेक अ‍ॅप्स स्वतःला 'कौशल्य आधारित गेम' असल्याचं सांगून बेकायदेशीर बेटिंगला प्रोत्साहन देत असल्याचा संशय ईडीला आहे.

ईडीने आरोप केला आहे की या अ‍ॅप्सच्या जाहिराती गुगल आणि मेटाच्या प्लॅटफॉर्मवर ठळकपणे प्रदर्शित करण्यात आल्या होत्या, ज्यामुळे त्यांचे यूजर्स वाढले.
GOOGLE | ED |
इतर बातम्या
Join Whatsapp Group