भारताच्या कामगिरीचं गुगलकडूनही कौतुक ! खास डुडल बनवून गुगलकडून भारताला शुभेच्छा
भारताच्या कामगिरीचं गुगलकडूनही कौतुक ! खास डुडल बनवून गुगलकडून भारताला शुभेच्छा
img
Dipali Ghadwaje
मुंबई : प्रत्येक भारतीयांसाठी चंद्रमोहिमेचं यश हा गर्व आणि अभिमानाचा क्षण आहे. संपूर्ण जगातून भारतावर कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. जगभरातील अंतराळ संशोधन संस्थांनीही भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचं कौतुक केलं आहे. युरोपियन स्पेस एजन्सी आणि अमेरिकन स्पेस एजन्सी म्हणजेच नासानं ही इस्रोला शुभेच्छा दिल्या आहेत.

अशातच गुगलने खास डुडल साकारलं आहे. यामध्ये चंद्राच्या भोवती चांद्रयान-3 प्रदक्षिणा घालताना दिसत आहे. चंद्राच्या भोवती फिरल्यानंतर चांद्रयान  चंद्राच्या कायम अंधारात असलेल्या दक्षिण ध्रुवावर उतरतं आणि त्यातून मग रोव्हर बाहेर येतो, असं संपूण ॲनिमेशनच्या रुपातील डुडल साकारतं गुगलने भारताच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक केलं आहे. 

भारताचं चांद्रयान-3 चंद्रावर उतरलं आणि नवा इतिहास रचला गेला आहे. कोणत्याही देशाला जमलं नाही ते भारताने करुन दाखवलं आहे. भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरला आहे. जगभरातील सर्व देश आणि विविध देशाचे पुढारी, नेते यांच्याकडून भारत आणि इस्रोवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आता सर्च इंजिन गुगलने ही भारताला चांद्रयान-3 मोहिमेच्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. गुगलने खास गुगल डुडल बनवत भारताच्या चंद्रमोहिमेचं कौतुक केलं आहे. 

गुगल डूडल  हा सर्च इंजिन गुगल च्या होमपेजवरील लोगोमध्ये केलेला खास बदल आहे. गुगलकडून खास दिवस, कार्यक्रम, मोहिम  किंवा उपक्रम तसेच उल्लेखनीय ऐतिहासिक व्यक्तींच्या स्मरणार्थ डुडल साकारलं जातं.
इतर बातम्या
Join Whatsapp Group