देशाच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी ईडीने अटक केली आहे. या अटकेविरोधात अरविंद केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र अरविंद केजरीवाल यांच्याकडून आता सुप्रीम कोर्टात दाखल केलेली ही याचिका मागे घेण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी ईडीकडून अटक करण्यात आली. या अटकेविरोधात केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणीही होणार होती. त्याआधीच ही याचिका मागे घेण्यात आली आहे.
अरविंद केजरीवाल यांच्यावतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयाला रिमांडच्या विरोधात असलेली आमची याचिका मागे घेत आहोत, असल्याचे सांगितले आहे. आता ते या अटकेविरोधात कनिष्ठ न्यायालयात दाद मागणार आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आपचे नेते तसेच कार्यकर्ते आक्रमक झाले असून राज्यात विविध ठिकाणी भाजपविरोधात आंदोलने सुरू केली आहेत. पुणे, मुंबई, सोलापूरमध्ये आप कार्यकर्त्यांकडून भाजपविरोधात निदर्शने करण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी आप कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.