ब्रेकिंग: केजरीवालांच्या न्यायालयीन कोठडीत 'या' तारखेपर्यंत वाढ
ब्रेकिंग: केजरीवालांच्या न्यायालयीन कोठडीत 'या' तारखेपर्यंत वाढ
img
Dipali Ghadwaje
न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 23 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणा ईडीने अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात अटक केली होती. आता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी 23 एप्रिलपर्यंत वाढवली आहे.

15 दिवसांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर आज तिहार जेलमधून केजरीवाल यांना व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून राऊल अव्हेन्यू कोर्टात सादर करण्यात आले. येथे त्यांना पुन्हा न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. अरविंद केजरीवाल यांना ईडीने 21 मार्च रोजी त्यांच्या घरातून अटक करण्यात आली होती. 

यानंतर कोर्टाने दोनदा ईडीच्या कोठडीत पाठवले. त्यानंतर त्यांना एक एप्रिल रोजी कोर्टाने न्यायालयीन कोठडीत पाठवले, तेव्हापासून केजरीवाल हे तिहार जेलमध्ये आहेत.

आज अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात देखील सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या याचिकेवर 24 एप्रिल पर्यंत ईडीकडून उत्तर मागितले आहे, कोर्टाने म्हटले की याचिकेवरील सुनावणी 29 एप्रिल रोजी सुरु होणाऱ्या आठवड्यात केली जाईल. 

दरम्यान, दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने सध्या तिहार तुरुंगात बंद असलेल्या मुख्यमंत्र्यांची न्यायालयीन कोठडी 23 एप्रिलपर्यंत वाढवली आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group