इंडिया आघाडीला मोठ खिंडार! इंडिया आघाडीला एकाच दिवसात दुसरा झटका, या पक्षाने ही दिला स्वबळाचा नारा
इंडिया आघाडीला मोठ खिंडार! इंडिया आघाडीला एकाच दिवसात दुसरा झटका, या पक्षाने ही दिला स्वबळाचा नारा
img
Dipali Ghadwaje
नवी दिल्ली : पश्चिम बंगालपाठोपाठ आता पंजाबमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. आम आदमी पक्षाने काँग्रेसला मोठा झटका दिला आहे. पंजाबमध्ये आप स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी याबाबत स्पष्ट केले आहे. ते म्हणाले की, पंजाबमधील सर्व 13 लोकसभा जागांवर आम आदमी पक्ष स्वबळावर लढवणार आहे. अरविंद केजरीवाल यांनी देखील याला सहमती दिल्याचं वृत्त आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी यापूर्वीही अनेकवेळा सार्वजनिक व्यासपीठावर यावर वक्तव्य केले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील होणाऱ्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याच्या निर्णयाला अरविंद केजरीवाल यांनी परवानगी दिलीय. मुख्यमंत्री  भगवंत मान यांनी अनेकवेळा सार्वजनिक व्यासपीठावरून याचा सुतोवाच केलाय. दम्यान पुढील काही दिवसात याची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

काही दिवसापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष्या ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. पश्चिम बंगालमधील सर्व जागांवर तृणमूल काँग्रेस उमेदवार देणार असून यात कोणाशीच युती करणार नसल्याचं त्यांनी घोषणा केली होती.

काँग्रेस पक्षासोबत आपली कोणतीच चर्चा झाली नाहीये. पश्चिम बंगालमध्ये आम्ही स्वबळावर एकट्याने निवडणूक लढवणार असल्याचं आम्ही नेहमी सांगितलंय, असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. राष्ट्रीय पातळीवर काय होईल याची चिंता नाही. परंतु आमचा पक्ष धर्मनिरपेक्ष आहे आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपला आम्हीच पराभूत करू शकतो. तसेच आम्ही इंडिया आघाडीचा एक भाग आहोत. राहुल गांधींची न्याय यात्रा राज्यातून जाणार आहे. परंतु आम्हाला त्याविषयी कोणतीच सुचना देण्यात आली नाहीये, असंही बॅनर्जी म्हणाले.

दरम्यान इंडिया आघाडीला एकाच दिवशी दोन मोठे झटके लागले आहेत. आप आणि तृणमूल काँग्रेस पक्षाने ज्यांची राज्यात सत्ता आहे त्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे आता इतर राज्यांमध्ये काय होतं याकडे ही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group