दिल्ली दारू घोटाळा प्रकरण : आम आदमी पक्षावरच होणार कारवाई? चार्जशीट दाखल करण्याचं काम सुरू
दिल्ली दारू घोटाळा प्रकरण : आम आदमी पक्षावरच होणार कारवाई? चार्जशीट दाखल करण्याचं काम सुरू
img
Dipali Ghadwaje
दिल्ली : कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी सूत्राकडून मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया, संजय सिंह, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

अरविंद केजरीवाल सध्या जामिनावर तिहारमधून बाहेर आले आहेत. मात्र आता दारू घोटाळा प्रकरणी आम आमदी पक्षावरच कारवाई होण्याची शक्यता आहे. आपवर चार्जशीट दाखल करण्याचं काम सुरू असल्याचं ईडीने म्हटलं आहे.  

दरम्यान या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांनी ईडीने आपल्याला बेकायदेशीररित्या अटक केल्याचं म्हटलं आहे. त्याविरोधात सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवरील निकाल कोर्टाने राखून ठेवला आहे.

या प्रकरणातील पक्षकारांना लेखी म्हणणं मांडण्यासाठी कोर्टाने एक आठवड्याचा वेळ दिला आहे. एका आठवड्यात ते सत्र न्यायालयात आपल म्हणणं मांडू शकतात, असं न्यायायलाने म्हटलं आहे.

दरम्यान आज झालेल्या सुनावणीवेळी ईडीने केजरीवाल आणि हवाला ऑपरेटर यांच्यातील चॅट chat सापडल्याचा दावा केला आहे. अरविंद केजरीवाल यांनी त्यांचं संभाषण नष्ट केलं आहे, पण आम्हाला हवाला ऑपरेटर्सकडून हे chat उपलब्ध झाल्याचा दावा ईडीने केला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group