आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी खलिस्तानवाद्यांकडून तब्बल 134 कोटी रुपयांची देणगी घेतली आहे. या देणगीच्या बदल्यात त्यांनी भुल्लरला सोडण्याचे आश्वासन दिले होते. खलिस्तानी लोकांशी झालेल्या बैठकीत ही डील झाली होती,’ असा दावा दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने केल्याचे समोर आले आहे.
शीख फॉर जस्टिस (SFJ) ही एक दहशतवादी संघटना आहे. पन्नू हा या संघटनेचा प्रमुख आहे. नुकताच त्याने अडीच मिनिटांचा व्हिडिओ जारी केला आहे. ज्यात त्याने दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल, आम आदमी पार्टी आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
पन्नू व्हिडिओअमध्ये म्हणतो की, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी 2014 ते 2022 दरम्यान विदेश दौरे केले. यावेळी त्यांच्या सोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे देखील होते. या दौ-यादरम्यान केजरीवाल आणि मान यांनी 16.7 दशलक्ष डॉलर्स जमा केले.