भारत राष्ट्र समितीच्या नेत्या आणि तेलंगाणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या के. कविता यांनी आम आदमी पक्षाच्या नेत्यांसोबत मद्य धोरणात कट रचला होता, यातून कविता यांनी ‘आप’च्या नेत्यांना १०० कोटी रुपये दिले होते, असा दावा च्या तपासात करण्यात आला आहे.
यामध्ये कविता यांना जो लाभ झाला, त्या बदल्यात कविता यांनी ‘आप’ला १०० कोटी दिले. या कटात ‘आप’चे नेते आणि दिल्लीची मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांचा सहभाग होता, असाही दावा EDने केला आहे. या धोरणातून जो लाभ निर्माण होणार होता, त्याच्या बदल्यात कविता यांनी अॅडव्हान्समध्ये ही रक्कम दिली होती, असेही EDचे म्हणणे आहे.
या प्रकरणात EDने आतापर्यंत २४५ छापे टाकले आहेत. ‘आप’चे नेते मनीष सिसोदिया, संजय सिंग, विजय नायर यांच्यासह १५ जणांना अटक झाली आहे. या प्रकरणात EDने मुख्य तक्रार आणि पाच पुरवणी तक्रारी दाखल केल्या आहेत. के. कविता यांना या प्रकरणी १५ नोव्हेंबरला अटक करण्यात आली आहे.