मुंबई : समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ED) त्यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रीचा गुन्हा दाखल केला आहे. वानखेडे यांनी गुन्हा रद्द करण्यासाठी आणि संभाव्य अटकेच्या कारवाई विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतल्याचं कळत आहे.
समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणी सीबीआयनं प्रकरणी समीर वानखेडेंवर गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यांच्याविरूद्ध ईडीने केला मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयने समीर वानखेडेंविरोधात कॉर्डिलिया क्रूज ड्रग्स प्रकरणी भ्रष्टाचाराचा आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. वानखेडे यांनी गुन्हा रद्द करण्यासाठी आणि संभाव्य अटकेच्या कारवाई विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या धरतीवर ईडीने ECIR दाखल केला होता.
नक्की प्रकरण काय
समीर वानखेडे यांनी कॉर्डेलिया क्रूझवर २ ऑक्टोबर २०२१ रोजी रेव्ह पार्टी दरम्यान छापा टाकला होता. तेथे त्यांनी अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केली होती. आर्यन खान २६ दिवस मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातात होता. त्यानंतर त्याला जामीन मिळाला होता. समीर वानखेडेंवर आर्यनला सोडण्याप्रकरणी शाहरूख खानकडून खंडणी मागितल्याचा आरोप आहे.
कॉर्डिलिया क्रूज ड्रग्स प्रकरणी आर्यन खानला अटक झाली होती. मात्र, कालांतराने त्याला क्लीन चीट देण्यात आली होती. या प्रकरणातील साक्षीदार के. पी. गोसावी आणि त्याचा साथीदार सनवेल डिसूजा यांनी शाहरुख खानच्या कुटुंबाकडून आर्यनला मदत करण्यासाठी खंडणी मागितल्याचा आणि 50 लाख रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
घेतलेले ५० लाख रुपये नंतर परत केल्याचं एफआयआरमध्ये नमूद आहे. कॉर्डेलिया क्रूझवर छापेमारी झाली, त्यावेळी समीर वानखेडे मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये झोनल डायरेक्टर होते. आर्यन खानला ड्रग प्रकरणातून क्लीन चीट देण्यासाठी २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप समीर वानखेडेसह अन्य चार आरोपींवर आहे.
दरम्यान याप्रकरणामध्ये समीर वानखेडे यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय. आता समीर वानखेडे यांच्याविरुद्ध ईडीने त्यांच्याविरूद्ध मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे.