ईडीची कारवाई: माजी आमदाराच्या घरी धाडीत सापडलं कोट्यवधीचं घबाड
ईडीची कारवाई: माजी आमदाराच्या घरी धाडीत सापडलं कोट्यवधीचं घबाड
img
Dipali Ghadwaje
गेल्या काही दिवसांपासून देशातील राजकीय नेत्यांसह उद्योगपतींवर ईडीने कारवाईचे सत्र सुरू केलं आहे. ईडीच्या कारवाईत कोट्यवधी रुपयांचं घबाड सापडत आहेत. ईडीने हरिणायातील यमुनानगर, फरीदाबाद, सोनीपत, मोहालीसह चंदीगढमध्ये अचानक छापेमारी केली. यावेळी एका माजी आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड सापडल्याची घटना समोर आली आहे. नोटांचा साठा इतका होता, की पैसे मोजताना मशीन देखील बंद पडले. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ईडीच्या पथकांनी गुरुवारी (४ जानेवारी) रात्री यमुनानगरचे माजी आमदार दिलबाग सिंग यांचे घर, कार्यालय आणि विविध ठिकाणी गुरुवारी एकाच वेळी छापेमारी केली. यावेळी या आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड सापडलं. नोटांचा साठा इतका होता, की पैसे मोजताना मशीन देखील बंद पडले. रात्री १२ वाजेपर्यंत ईडीचे अधिकारी नोटा मोजत होते. 
 
दरम्यान ईडीच्या पथकाला दिलबाग सिंह यांच्या घरात ५ कोटी रुपयांच्या चलनी नोटा सापडल्या. याशिवाय विदेशी शस्त्रे आणि ३०० जिवंत काडतुसेही देखील आढळून आले. ही शस्त्रे विदेशी असल्याचे सांगण्यात येत आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करत शस्त्रे आणि जिवंत काडतुसे जप्त केली.

नोटा मोजताना अचानक मशीन बंद पडल्यामुळे ईडीचे अधिकारी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत पैसे मोजत होते. अवैध उत्खनन प्रकरणी तपास यंत्रणेने ही कारवाई केल्याची माहिती आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर बेकायदा खाण उत्खननाचे गुन्हे दाखल झाल्यानंतर ईडीची ही मोठी कारवाई आहे.

ईडीच्या अधिकार्‍यांनी देश-विदेशातील अनेक चल-अचल संपत्तीशी संबंधित कागदपत्रेही ताब्यात घेतली आहेत. दरम्यान ईडीच्या अचानक छापेमारीमुळे परिसरातील खाण व्यापाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. सध्या ईडीचे पथक खाणकामाशी संबंधित कागदपत्रांचीही छाननी करीत आहेत.
crime | ed raid | ED |
इतर बातम्या
Join Whatsapp Group