
२९ जुलै २०२५
आत्ताच एक मोठी बातमी समोर आली आहे. वसई-विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या घरी ईडीनं छापा टाकलाय. विशेष म्हणजे अनिलकुमार पवार यांनी पदभार सोडल्यानंतर दुसऱ्या दिवशीच छापे पडलेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , वसई विरार शहरातील तब्बल 12 ठिकाणी ईडीनं छापेमारी केलीय. नालासोपाऱ्यातील 41 अवैध इमारतीच्या घोटाळ्या प्रकरणी ईडी चौकशी सुरु आहे. EDचे हे छापेही याच घोटाळ्यासंबंधात असल्याचं समजतंय.
नालासोपाराच्या ४१ अनधिकृत इमारतीप्रकरणी मंगळवारी ईडीने वसई विरार मधील १२ ठिकाणी छापे घातले आहेत.
यामध्ये महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या शासकीय निवासस्थानी सकाळी पाच वाजता ईडीने छापेमारी केली आहे. काल सोमवारी पालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी आपल्या पालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार सोडून नवीन आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांना दिला.
त्यानंतर मंगळवारी सकाळी पाच वाजता ईडीने छापेमारी सुरू केली आहे. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.
Copyright ©2025 Bhramar