अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला ! अंगावर कुठला तरी पदार्थ फेकून हल्ल्याचा प्रयत्न
अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला ! अंगावर कुठला तरी पदार्थ फेकून हल्ल्याचा प्रयत्न
img
दैनिक भ्रमर
दिल्लीची विधानसभा निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. याचदरम्यान आता  बातमी आहे.  दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. शनिवारी ग्रेटर कैलाश परिसरात केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. आज ग्रेटर कैलाश परिसरामध्ये त्यांच्या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं हा हल्ला झाला. 

या हल्ल्यामध्ये केजरीवाल यांना कोणतीही दुखापत झालेली नाहीये, ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. हल्लेखोराने त्यांच्या अंगावर कुठला तरी पदार्थ फेकून हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सुरक्ष रक्षकांकडून या हल्लेखोराला लगेच ताब्यात घेण्यात आलं आहे.

दरम्यान आता , या हल्ल्यानंतर आम आदमी पार्टीकडून भाजपवर आरोप करण्यात आला आहे. या हल्ल्यामागे भाजपचा हात असल्याचं आपने म्हटलं आहे. यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group