ईडीची मोठी कारवाई! १२,००० कोटींच्या मानवी केसांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
ईडीची मोठी कारवाई! १२,००० कोटींच्या मानवी केसांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
img
Dipali Ghadwaje
आतापर्यंत आपण सोनं, चांदी आणि हिऱ्याची तस्करी ऐकली आहे. आता चक्क केसांची तस्करी करणारं एक मोठं रॅकेट समोर आलं आहे. चीनमध्ये टक्कल पडण्याची समस्या निर्माण झाली आहे. अशातच चीनला केसांची तस्करी केली जात असल्याचं एक मोठं रॅकेट समोर आलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार , ईडीने 11 हजार 793 कोटी रुपयांच्या मानवी केसांच्या तस्करीचं रॅकेट प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. हे तीन पॉइंट कॉरिडॉरद्वारे सुरू असलेलं एक कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरण आहे.
 
म्यानमारमधील व्यापाऱ्यांकडून पैसा हैदराबादला कसा पाठवला जातो, याचा खुलासा झाला आहे. ही रक्कम अनेक खात्यांमधून जमा केली जात असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान एकूण 11 हजार 793 कोटी रुपयांपैकी सुमारे 2,491 कोटी रुपये रोख स्वरूपात (21% पेक्षा जास्त) अशा खात्यांमध्ये जमा करण्यात आले आहेत.

याप्रकरणी ईडीने फेब्रुवारी 2022 मध्ये देशभरात शोध घेतला. म्यानमारमधून केस निर्यात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार ED ने मोडस ऑपरेंडीचा पर्दाफाश केल्यानंतर कारवाई केली.

2021 मध्ये हैद्राबाद स्थित नायला फॅमिली एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध बेनामी आयात निर्यात कोड, तोतयागिरी आणि खोटेपणा केल्याबद्दल गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हैदराबाद विमानतळावरून म्यानमार, बांगलादेश, व्हिएतनाम आणि चीनमध्ये केसांची तस्करी होत असल्याचं समोर आलं आहे. या कंपनीने कमी दरात केसांची निर्यात करण्यासाठी अनेक बेनामी संस्था तयार केल्याचं सांगितलं जात आहे.  
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group