नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेची निवडणूक अत्यंत जवळ येऊन ठेपली आहे. 5 तारखेला मतदान होणार आहे. तर 8 तारखेला निकाल जाहीर होणार आहेत. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. काल महराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत प्रचारसभेला संबोधित केले. यावेळेस त्यांनी अरविणे केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
“दिल्लीच्या माजी मुख्यमंत्र्यांनी यमुना नदी स्वच्छ करू असे वचन दिले होते. नदी साफ करून त्यात मंत्रीमंडळासह डुबकी मारतील असे त्यांनी सांगितले होते.” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बलबीर मतदारसंघात प्रचारसभा घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी यमुना नदीच्या प्रदूषणावरून अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अरविंद केजरीवाल यांनी वचन दिले होते की, ते यमुना नदी स्वच्छ करतील. त्यानंतर ते आणि त्यांचे मंत्रिमंडळ यमुनेत स्नान करतील. मात्र आता तर यामुनेचे पाणी आधीपेक्षा जास्त प्रदूषित आहे. अरविंद केजरीवाल तुम्ही आताच तुमच्या मंत्रिमंडळासह यमुनेत डुबकी मारा आणि दिल्लीपासून दूर निघून जा. दिल्लीची जनता तुम्हाला हेच सांगत आहे.”