आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री आतिशी कालकाजी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्या आहे. निवडणुकीत भाजपचे रमेश बिधुरी यांचा त्यांनी पराभव केला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार , आतिशी यांनी कालकाजी येथून दुसऱ्यांदा बाजी मारली आहे. मुख्यमंत्री आतिशी यांच्या विरोधात काँग्रेसने अलका लांबा यांना उमेदवारी दिली होती. मतमोजणीदरम्यान सुरुवातीला आतिशी भाजपच्या रमेश बिधुरी यांच्या मागे होत्या पण शेवटी त्यांनी बाजी मारली. आतिशी यांनी चार महिन्यांपूर्वी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.