मुलगा शहीद झाला, पण सुनेनं......; कॅप्टन अंशुमन यांच्या आई-वडिल नेमकं काय म्हणाले....
मुलगा शहीद झाला, पण सुनेनं......; कॅप्टन अंशुमन यांच्या आई-वडिल नेमकं काय म्हणाले....
img
Dipali Ghadwaje
दिल्ली : सियाचिनमध्ये गेल्या वर्षी १९ जुलै रोजी सहकाऱ्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात कॅप्टन अंशुमन सिंह शहीद झाले होते. नुकतंच त्यांना मरणोत्तर कीर्ति चक्र पुरस्काराने गौरवलं गेलं. पत्नी स्मृती सिंह आणि आईने हा पुरस्कार स्वीकारला होता. दरम्यान, शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया समोर आली असून त्यांनी दु:ख व्यक्त केलंय. शहीद कॅप्टन अंशुमन यांच्या आई वडिलांनी म्हटलं की, मुलगा शहीद झाला, पण सगळं सून घेऊन गेली.

कीर्ति चक्र विजेते शहीद अंशुमन सिंह यांचे कुटुंबिय सध्या चर्चेत आहेत. गेल्या वर्षी सियाचिनमध्ये शहीद झालेल्या अंशुमन सिंह यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ५ जुलै रोजी मरणोत्तर कीर्ति चक्र पुरस्काराने गौरवलं. मात्र आता, शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या आई वडिलांनी माध्यमांशी बोलताना सून स्मृतिवर गंभीर आरोप केले आहेत. आई वडिलांनी सांगितलं की, आमचा मुलगा शहीद झाला पण आम्हाला काही मिळालं नाही. पुरस्कार आणि पुरस्काराची रक्कम दोन्ही सून घेऊन गेली.

शहीद कॅप्टन अंशुमन यांचे वडील रवी प्रताप सिंह यांनी सांगितलं की, आम्ही NOKच्या निकषात बदल करण्याची मागणी करतो. यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनाही कल्पना दिलीय. याशिवाय दोन दिवस आधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यांनीही यामध्ये बदलाची इच्छा व्यक्त केली. ५ महिन्यांपूर्वी मुलाचं लग्न झालं होतं. त्याला मुलबाळ नाही, पण आता आई-वडिलांकडे मुलाच्या फोटोशिवाय काहीच नाही.

आई-वडिलांनी दावा केला की सून आम्हाला सोडून गेलीय. तिने तिचा पत्ताही बदलला आहे. कीर्ति चक्र स्वीकारण्यासाठी शहीद अंशुमनची आई सोबत गेली होती पण आमच्या मुलाच्या बॉक्सवर लावण्यासाठी काहीच नाहीय. आमच्यासोबत जे झालं ते कोणासोबत होऊ नये असं अंशुमन यांच्या वडिलांनी म्हटलंय. शहीद अंशुमन यांच्या वडिलांनी केलेल्या आरोपांवर अंशुमन यांच्या पत्नीने कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.
delhi |
इतर बातम्या
Join Whatsapp Group