धक्कादायक !  ट्रक रिव्हर्स घेत असताना अचानक रस्त्याला पडला भलामोठा खड्डा,  पुढे काय घडले ?
धक्कादायक ! ट्रक रिव्हर्स घेत असताना अचानक रस्त्याला पडला भलामोठा खड्डा, पुढे काय घडले ?
img
दैनिक भ्रमर
पुण्यातील समाधान चौक परिसरात धक्कादायक घटना घडली आहे . इथे एका खड्यात संपूर्ण ट्रक पडला आहेदरम्यान जवळील सीसीटीव्हीमध्ये संपूर्ण घटना कैद झाली. या घटनेनंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.  विशेष म्हणजे ट्रकसह आणखी दोन गाड्या देखील त्या खड्ड्यात अडकल्याची माहिती समोर आली आहे. खड्यात अडकलेल्या ड्रायव्हरला बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे.

दरम्यान ,   संबंधित घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रस्ता चांगाला असताना त्याला अचानक खड्डा काय पडलो आणि ट्रक पाहता-पाहता थेट 30 ते 40 फूट खाली जातो हे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ही घटना नेमकी कशामुळे घडली? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. संबंधित ट्रक हा पुणे महापालिकाचा असल्याची माहिती आहे. या घटनेत ट्रक चालक हा थोडक्या बचावला आहे. त्याने प्रसंगावधान साधत थेट ट्रकमधून उडी मारत स्वत:चा जीव वाचवला. दरम्यान, आता घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती .

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रसत्यावर अचानक हा खड्डा पडला. पुणे महापालिकाचा ट्रक संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास सिटी पोस्ट इमारतीच्या परिसरात आला होता. ड्रेनेज लाईन साफ करण्यासाठी या ट्रकला बोलवण्यात आलं होतं. पण हा ट्रक रिव्हर्स घेत असताना अचानक मागे भलामोठा खड्डा पडला. हा खड्डा हळहळू खोल होत गेला आणि पुणे महापालिकेचा पू्र्ण ट्रक खड्ड्यात गेला आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group