पुण्यातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. एका महिला पोलिसाने मित्राच्या पत्नीला परपुरुषासोबत शारिरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी संबंधित महिलेने कोल्हापुरातील गडहिंग्लज पोलिसांत तक्रार दिल्यानंतर महिला पोलिसावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. अनघा ढवळ असे आरोपी महिला पोलिसाचे नाव आहे.
पुणे पोलीस दलातील एका महिला कर्मचाऱ्यानेच गुन्हा केला आहे. मित्राच्या पत्नीला परपुरुषासोबत शारिरिक संबंध ठेवणाचा आग्रह त्या महिला कर्मचाऱ्याने केला. तसेच शारिरीक संबंध ठेवले नाही तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला जीवे मारण्यात येईल. मी पुण्याची लोकल आहे. माझी गुंडासोबत ओळख आहे, असे म्हणत धमकवले. या प्रकरणाची तक्रार मिळाल्यानंतर पुणे पोलीस आयुक्तांनी कारवाई करत त्या महिला पोलिसाचे निलंबन केले आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की , पुणे पोलीस दलातील कोथरुड वाहतूक पोलीस शाखेत अनघा सुनील ढवळे पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. तिने तिच्या मित्राच्या पत्नीवर पुरुषाबरोबर संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला. जर तू परपुरषाबरोबर शारीरीक संबंध ठेवले नाही तर तुला आणि तुझ्या घरच्या लोकांना ठार करु, अशी धमकी दिली. आम्ही एक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ब्लॅकचे व्हाईट मनी करतो. त्यात 9 कोटींचा व्यवहार झाला आहे. त्यातील तुझ्या नवऱ्याला 40 ते 50 लाख रुपये मिळणार आहेत, असे अनघा ढवळे हिने त्या पीडित महिलेस सांगितले.