राज्य सरकारचा मोठा निर्णय ! वैष्णवीच्या बाळाचा ताबा आता ''या'' व्यक्तीकडे असणार
राज्य सरकारचा मोठा निर्णय ! वैष्णवीच्या बाळाचा ताबा आता ''या'' व्यक्तीकडे असणार
img
DB
पुण्यातील वैष्णवी हगवणे नावाच्या तरुणीने 16 मे रोजी  गळफास घेऊन आम्हत्या केली, सासरच्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप आहे,या घटनेनं  घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून हगवणे कुटुंबावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. दरम्यान,  या प्रकरणात पोलिसांनी तिचा पती, दीर, सासू, ससार आणि नणंद यांना अटक केली आहे. मात्र वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या बाळाचं संगोपन कोण करणार? असा प्रश्न होता, याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूपश्चात त्यांचा 9 महिन्यांचा मुलगा जनक हगवणे याचा सांभाळ करण्यासाठी बाल कल्याण समितीने त्याची आजी व वैष्णवी हगवणे यांच्या आई स्वाती कस्पटे यांना योग्य व्यक्ती म्हणून नियुक्त केलं आहे. याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

‘पुण्यातील स्व. वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूपश्चात त्यांचा 9 महिन्यांचा मुलगा जनक हगवणे याचा सांभाळ करण्यासाठी बाल कल्याण समितीने त्याच्या आजी व स्व. वैष्णवी हगवणे यांच्या आई श्रीमती स्वाती कस्पटे यांना योग्य व्यक्ती म्हणून नियुक्त केले आहे. याबाबत जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या सामाजिक तपासणी अहवालानुसार श्रीमती स्वाती कस्पटे याच योग्य व्यक्ती असून त्यांचे सामाजिक, भावनिक व कौटुंबिक वातावरण बालकाच्या हितासाठी अनुकूल आहे.

यापुढे स्व. वैष्णवी हगवणे यांचा मुलगा कु. जनक हगवणे यांचा कायदेशीर ताबा श्रीमती स्वाती  कस्पटे यांच्याकडे असेल. बालकाच्या शिक्षणाची, आरोग्याची व सर्वांगीण विकासाची संपूर्ण जबाबदारी श्रीमती स्वाती कस्पटे यांची असेल.’  असं ट्विट आदिती तटकरे यांनी केलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group