शेतातील उत्पादन आणि पिके बहरण्यासाठी पाऊस हा गरजेचा असतो. मात्र, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की काय होते त्याचा प्रत्यय सध्या येत आहे. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भाजीपाल्यांच्या पिकावर मोठा परिणाम झाला असून याचा फटका भाजीपाल्याच्या दरावर झालाय.
नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेत भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेत. आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने ऐन गणेशोत्सव काळात दर प्रचंड वधारले असून याचा फटका सर्वसामान्य जनतेच्या खिशाला बसतोय.
भाजीपाला आजचे दर
फरसबी - 50 रुपये
घेवडा - 55 रुपये
काकडी - 26 रुपये
शेवगा शेंग - 35 रुपये
वाटाणा - 150 रुपये
फ्लॉवर - 30 रुपये
गाजर - 27 रुपये
ढोबळी मिरची - 37 रुपये
भेंडी - 47 रुपये
चवळी शेंग - 28 रुपये
सुरण - 58 रुपये
पालेभाज्यांचे आजचे दर
कोथिंबीर 50 ते 100 रुपये
मेथी - 30 रुपये पालक - 26 रुपये
कांदापात - 12 रुपये
मुळा - 40 रुपये