अभिनेता कार्तिक आर्यनवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या वादळात घाटकोपरमध्ये एक उंच होर्डिंग कोसळले होते, ज्यामध्ये 16 लोकांचा मृत्यू झाला होता आणि त्यात अभिनेता कार्तिक आर्यनचे मामा आणि मामा यांचाही समावेश होता.
56 तासांनंतर सापडले मृतदेह
ही घटना 13 मे रोजी मुंबईतील घाटकोपर परिसरात घडली. 56 तासांनंतर कार्तिकच्या मामा आणि मामीचे मृतदेह सापडले. विशेष म्हणजे त्यांच्या मृतदेहाची ओळख त्यांच्या अंगठीवरुन झाली होती. कार्तिकचे मामा आणि मामी घरी जात असताना झाला होर्डिंगचा अपघात अपघातात सेवानिवृत्त हवाई वाहतूक नियंत्रण महाव्यवस्थापक मनोज चांसोरिया (60) आणि त्यांची पत्नी अनिता (59) यांचा मृत्यू झाला आहे.
कार्तिकचे मामा आणि मामी असलेलं हे दांपत्य पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर थांबले होते आणि तिथे हे घातक होर्डिंग लावण्यात आलं होतं. कार्तिकचे मामा आणि मामी मध्य प्रदेशातील त्यांच्या घरी जात असताना हा अपघात झाला.
या होर्डिंगखाली दबून कार्तिकच्या मामा आणि मामीचा अत्यंत वेदनादायी मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांची ओळख त्याच्या चेहऱ्यावरून नाही तर त्याच्या अंगठी आणि कारने झाली.