दारूच्या नशेत अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू; गर्दी जमल्यावर लोळून तमाशा
दारूच्या नशेत अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू; गर्दी जमल्यावर लोळून तमाशा
img
वैष्णवी सांगळे
एकीकडे अख्खं जग नव्या वर्षांचं स्वागत करण्यात गुंतलेलं आणि दुसरीकडे मनोरंजन विश्व मात्र पुरतं हादरलंय. केरळमधील सुप्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ प्रभूनं गाडीनं एका लॉटरीवाल्याला चिरडलंय. अभिनेता सिद्धार्थ प्रभू मद्यधुंद अवस्थेत असताना ही घटना घडली आहे. या 'हिट अँड रन' प्रकरणात ५३ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  अपघाताची ही घटना २४ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास कोट्टायम येथे एम. सी. रोडवर घडली. या प्रकरणी पोलिसांनी सिद्धार्थ प्रभूवर गुन्हा दाखल केला आहे.

सिद्धार्थ प्रभू मद्यधुंद अवस्थेत कार चालवून कोट्टायमकडून येत होता. अभिनेता नशेत असल्यामुळे त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि त्याची गाडी समोरच्या वाहनाला धडकली. कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ५३ वर्षीय व्यक्तीला धडक दिली. हा व्यक्ती लॉटरीचा व्यवसाय करत होता. या रोड अपघातात कनकराज गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

अपघात झाल्यावर लोक जमा झाली. सिद्धार्थ दारूच्या नशेत असल्यामुळे त्याने सर्वांना शिवीगाळ घातली. तसेच अभिनेत्याचे पोलिसांसोबत देखील भांडण झाले. गर्दी जमल्यावर लोळून तमाशा त्याने केला. धक्काबुक्की देखील झाली. मात्र शेवटी अभिनेत्याला पोलीसांनी ताब्यात घेतले. जेव्हा सिद्धार्थची वैद्यकीय चाचणी झाली, तेव्हा समजलं की, तो दारू पिऊन गाडी चालवत होता. तब्बल सात दिवस कनकराज रुग्णालयात दाखल होता. अखेर १ जानेवारी २०२६ ला त्याने अखेरचा श्वास घेतला. कनकराज यांच्या निधनानंतर अभिनेत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Actor |
इतर बातम्या
Join Whatsapp Group