रक्षाबंधनाआधी मिळणार गुड न्यूज, सरकारी कर्मचाऱ्यांचा 'इतका' वाढणार महागाई भत्ता
रक्षाबंधनाआधी मिळणार गुड न्यूज, सरकारी कर्मचाऱ्यांचा 'इतका' वाढणार महागाई भत्ता
img
वैष्णवी सांगळे
केंद्र सरकारकडून रक्षाबंधनापूर्वीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट देण्यात येणार आहे. सरकारने 7 व्या वेतन आयोगातंर्गत महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा पूर्वीच केली आहे. सरकार जुलै 2025 मध्ये 3-4 टक्क्यांचा महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना देऊ शकते. यापूर्वी मार्च महिन्यात 2 टक्के डीए मध्ये वाढ करण्यात आली होती. त्यानंतर डीए 53 टक्क्यांहून वाढून 55 टक्क्यांवर आला आहे.

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये तीन ते चार टक्के वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सातव्या वेतन आयोगांतर्गत केंद्र सरकार डीए वाढीची घोषणा करू शकते. महागाई लक्षात घेऊन सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनवेळा महागाई भत्ता दिला जातो. एक जानेवारी आणि १ जुलै या तारखेपासून महागाई भत्ता लागू होतो. मार्चमध्ये जाहीर झालेला भत्ता 1 जानेवारीपासून लागू मानला गेला आहे. आता होणारी घोषणा 1 जुलै 2025 पासून लागू मानली जाईल. डीए केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिला जातो, तर डीआर निवृत्त कर्मचाऱ्यांना दिले जाणाऱ्या पेन्शनवर लागू होते.

संतोष देशमुख हत्या प्रकरण ; न्यायालयाने दोषमुक्तीचा अर्ज फेटाळताच कराडचा मोठा निर्णय, कोर्टात आज काय काय घडलं?

अखिल भारतीय औद्योगिक कामगार उपभोक्ता मूल्य निर्देशांक (AICPI-IW) च्या आधारावर कामगारांसाठी महागाई भत्त्याची गणना केली जाते. AICPI-IW निर्देशांक देशातील 88 औद्योगिक केंद्रांमधील 317 बाजारांमधून गोळा केलेल्या किरकोळ किंमतींच्या आधारावर जाहीर केला जातो. डीएमध्ये सुधारणा करण्यापूर्वी सरकारकडून मागील सहा महिन्यांचा डेटा तपासते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group