खुशखबर ! पेन्शन संदर्भातील
खुशखबर ! पेन्शन संदर्भातील "हा" नियम बदलल्याने लाखो कर्मचाऱ्यांना मोठा फायदा
img
Dipali Ghadwaje
नवी दिल्ली : देशातील लाखो पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने कर्मचारी पेन्शन योजना 1995 आता मोठा बदल होणार आहे.  आधी,  सहा महिन्यांच्या आत योजना बंद झाली असेल तर सदस्यांना पैसे मिळायचे नाहीत. आता नविन नियम बदलाने सहा महिन्यांहून कमी अंशदान केल्याने योजना बंद झालेल्या कर्मचाऱ्यांना देखील फायदा होणार आहे. योजना आणखीन चांगली करण्यासाठी ईपीएस नियमात सुधारणा केली आहे.

आता विड्रॉअल बेनिफीट या गोष्टीवर अवलंबून असणार की सदस्यांनी किती महिने सेवा केली आहे. आणि वेतनावर किती ईपीएस योगदान केले जाणार आहे. या नियमाने पैसे काढणे सोपे होणार आहे. या नियम बदलण्याने 23 लाखांहून जास्त EPS सदस्यांना लाभ होणार आहे.

सहा महिन्याच्यां आत नोकरी सोडल्याने किंवा अन्य कारणाने योजनेत हप्ते बंद झालेल्यांना देखील  पैसे काढता येणार आहेत. दरवर्षी लाखो ईपीएस सदस्य पेन्शनसाठी आवश्यक असणारे सलग दहा वर्षे हप्ते न भरताच ही योजना अर्धवट सोडतात. देशात सहा महिन्यांच्या आत नोकरी सोडल्याने ही योजना बंद झालेल्यांची संख्या मोठी आहे.

आधीचा जूना नियम

आतापर्यंत विड्रॉअल बेनिफीटचे कॅलक्युलेशन संपूर्ण वर्षांत अंशदायी सेवेचा अवधी आणि त्या वेतनाच्या आधारे केले जात होते, ज्यावर ईपीएस अंशदानचे वाटप केले जात होते. अंशदायी सेवा सहा महिने किंवा त्याहून अधिक वेळ पूर्ण केल्यानंतरच सदस्यांना पैसे काढता येत होते. त्यामुळे सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त वेळ अंशदान करण्यापूर्वीच योजना सोडणाऱ्या सदस्यांना कोणताही लाभ मिळत नव्हता. जुन्या नियमांमुळे सहा महिन्यांहून कमी अंशदान सेवा देण्याआधीच योजनेतून बाहेर पडत होते.

आर्थिक वर्षे 2023-24 च्या दरम्यान अंशदान सेवा सहा महिन्यांहून कमी झाल्यामुळे पीएफचे पैसे काढण्याचे सात लाख दावे फेटाळण्यात आले होते. आता जे ईपीएस सदस्य जे 14.06.2024 पर्यंत 58 वर्षांचे झाले नाहीत, त्यांना आता पैसे काढण्याची सुविधा मिळणार आहे.

पेन्शन कशी मिळते

ईपीएस एक पेन्शन योजन असून ती ईपीएफओद्वारा चालविली जाते. या योजनेंतर्गत 10 वर्षे योगदान करावे लागते. त्यानंतरच कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन सुरु होते. या योजनेत पूर्वीचे आणि नवीन ईपीएफ सदस्य सामील होत असतात. सदस्य कर्मचाऱ्याला नोकरी देणारी संस्था आणि ईपीएफ फंडातील कर्मचाऱ्याच्या वेतनातून 12 टक्के अशा दोन समान रक्कमेचे हप्ते जमा केले जातात. कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे संपूर्ण वाटा EPF मध्ये आणि कंपनीच्या योगदानाचे 8.33 टक्के कर्मचारी पेन्शन स्कीम मध्ये आणि 3.64 टक्के दर महिन्याला EPF मध्ये जमा केले जाते. कमीत कमी 10 वर्षांची नोकरी पूर्ण केल्यानंतर आणि निवृत्तीनंतर पेन्शनचा लाभ दिला जातो
इतर बातम्या
Join Whatsapp Group