सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नोव्हेंबर महिना महत्त्वाचा ; ८ दिवसांत हे काम करा, अन्यथा....
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नोव्हेंबर महिना महत्त्वाचा ; ८ दिवसांत हे काम करा, अन्यथा....
img
Dipali Ghadwaje
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळते. परंतु या कर्मचाऱ्यांनी जर अजूनही वार्षिक जीवन प्रमाणपत्र सादर केले नसेल, तर तुमची पेन्शन तुम्हाला मिळणार नाही. तुमच्याकडे वार्षिक जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी फक्त ९ दिवस उरले आहेत. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर हे काम करा.

केंद्र सरकारच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना जीवन प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे. ८० वर्षांवरील पेन्शनधारकांना १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या काळात हे प्रमाणपत्र सादर करायचे होते. तर निवृ्त्तीवेतनधारकांना १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या काळात प्रमाणपत्र सादर करायचे होते. त्यामुळे ज्यांनी कोणी प्रमाणपत्र सादर केले नाही, त्यांनी लवकरात लवकर सादर करावेत. 

जीवन प्रमाणपत्र कोण सबमिट करणार?

पेन्शनधारकांसाठी नोव्हेंबर महिना खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला ३० नोव्हेंबरपर्यंत त्यांची हयातीचे प्रमाणपत्र सादर करायचे आहे. जेणेकरुन तुम्हाला कोणत्याही अडचणींशिवाय दर महिन्याला पेन्शन मिळेल. जर तुम्ही अजूनही हे प्रमाणपत्र सादर केले नसेल तर लवकरात लवकर करावेत. जर तुम्ही हे जीवन प्रमाणपत्र नोव्हेंबर महिन्यात सादर केले नाही तर तुम्हाला डिसेंबर महिन्यात पेन्शन मिळण्यास अडथळे येऊ शकतात. आत फक्त तुमच्याकडे ८ दिवस बाकी आहेत. सुपर ज्येष्ठ नागरिक म्हणजे ८० वर्षांवरील नागरिकांना १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत प्रमाणपत्र सादर करायचे होते. तर इतर पेन्शनधारकांना नोव्हेंबर महिन्यात प्रमाणपत्र द्यायचे होते. तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने प्रमाणपत्र सादर करता येते.

प्रमाणपत्र सादर न केल्यास काय होणार? 

जर तुम्ही जीवन प्रमाणपत्र सादर केले नाही तर तुम्हाला डिसेंबर महिन्यापासून पेन्शन मिळणार नाही.UIDAI नुसार, एकदा पेन्शन सिस्टीममध्ये जीवन प्रमाणपत्र अपलोड केल्यान तुम्हाला पुढील पेन्शन ही थकबाकीच्या रक्कमेसह दिली जाईल. परंतु जीवन प्रमाणपत्र हे तीन किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी जमा केले जाणार नाही. याप्रमाणे जीवन प्रमाणपत्र सादर करा जीवन प्रमाणपत्र म्हणजे तुमच्या अस्तित्वाचा पुरावा आहे. तुम्ही हयात असून तुम्हाला ही पेन्शन मिळते, असं यातून दिसून येते.

तुम्ही घरबसल्या जीवन प्रमाण पोर्टलद्वारे ऑनलाइन पद्धतीने सादर करु शकतात. यासाठी तुमच्याकडे ओळखपत्र असणे गरजेचे आहे. त्याचसोबत तुम्ही पोस्टाद्वारे, उमंग अ‍ॅपद्वारे, पीडीएद्वारेदेखील प्रमाणपत्र सादर करु शकतात.
इतर बातम्या
Join Whatsapp Group